मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यात शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येण्याची चर्चा सुरु होती. त्यानंतर या युतीनंतर महाविकास आघाडीमध्ये देखील बिघाड झाला आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी शरद पवार भाजपसोबत असल्याचा गौफ्यस्फोट केला होता. आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील यावर सडकून टीका केली आहे.
किंचित सेना आणि वंचित सेना एकत्र झाली तरी भाजपला अडचण येणार नाही हे आम्हाला नवीन नाही. महाविकास आघाडीतील बाकी घटकांना देखील हे माहित नाही. नाना पटोलेंना देखील हे मान्य नाही. असा टोला बावनकुळे यांनी लगावला.
गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपने मनुस्मृती सोडली तर भाजपसोबत जायला तयार असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले होते. यावर संतापून प्रकाश आंबेडकर इतक्या लहान डोक्याचे आहेत. भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा स्वीकार करुन त्यांना अभिप्रेत असलेले शासन पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहे. असे बावनकुळे म्हणाले.
दरम्यान, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान हे काँग्रेसने स्वत:च्या स्वार्थासाठी अनेकवेळा तोडले. मोदींनी बाबासाहेबांच्या संविधानाच्या कुठल्याही कलमात सुधारणा केली नाही. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस समोर नेत आहेत. हा विचार प्रकाश आंबेडकरांनी करायला हवा. तरीदेखील तुम्ही व्यक्तिगत विरोधी म्हणून राजकारणासाठी अशी टीका करत असाल तर हे दुर्दैवी आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.