मुंबई | राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या व सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी भाजप पक्षात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितित बेर्डे यांनी प्रवेश केला. देवेंद्र फडणवीसांनी यांनी सर्वांच्या उपस्थितीत प्रिया बेर्डे यांचं पक्षात स्वागत केलं.
आज पक्षीय कार्यकारणी बैठक झाली. यावेळी अनेक नवीन सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी प्रिया बेर्डे यांनीही देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भाजप मधला प्रवेश स्वीकारला.
दरम्यान, प्रिया बेर्डेंनी नुकताच म्हणजे ७ जुलै २०२२ला राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. एक वर्ष देखील त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत काम करू शकल्या नाही. प्रिया बेर्डे यांनी अखेर आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला रामराम ठोकला.