मुंबई | महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाने निकाल जाहीर केला. यामध्ये १६ आमदारांवरील अपात्रतेचा मुद्दा निकाली निघाला असून त्याचे अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे दिले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. तर उद्धव ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्रीपदावर कायम राहणार आहेत.
सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी निर्णय देताना म्हटले, उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे न जाता त्यांनी राजीनामा दिला म्हणून ही स्थिती पूर्ववत करता येणार नाही. त्यामुळं सर्वात मोठा पक्ष भाजपच्या पाठिंब्यानं एकनाथ शिंदे यांना राज्यपालांनी शपथ देणे योग्य आहे. त्याचबरोबर भरत गोगावलेंची प्रतोदपदी केलेली नियुक्ती अवैध असल्याचं देखील सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.
दरम्यान, सुप्रीम कोर्टानं राज्यपालांच्या भूमिका बेकायदा ठरवल्या आहेत. त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या पत्रावरुन राज्यपालांनी कारवाई सुरु करणं चुकचं होतं, असंदेखील सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे.