मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिनाच्या सोहळ्यात राष्ट्रवादीतील दिग्गज नेतेमंडळी उपस्थित राहिले. यावेळी अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली आहे. नुसती दाढी कुरवाळता, काम केलं की कौतुक करेन अशा शब्दात त्यांनी शिंदेंवर शब्दांचा वार केला.
एकनाथ शिंदे म्हणतात की, सतत माझ्यावर तुम्ही टीका करता. तुम्ही काम करत नाही केवळ दाढी कुरवाळत बसता काम करा मी कौतुक करेल. गुवाहटी, गोवा फिरुन आलात ते असले धंदे करायला आलात का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
12- 12 लोडशेडींगमधून आम्ही मुक्त केलं तरीही आज लोडशेडींग का होतं आहे. याचं उत्तर कोण देणार? आज विधानभवनामध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कोट्यवधी रुपये त्यांनी खर्च केले. आता गाड्यांवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिसतात. आता यांना आम्हाला बघायचं नाही तरी का दाखवता? असंदेखील पवार यावेळी म्हटले.
दरम्यान, राज्यामध्ये दंगली का घडतायत याचा मास्टर माईंड शोधून काढला पाहिजे. महिलांवर अत्याचाराच्या घटना समोर येतं आहे. धाराशिवमध्ये एका व्यक्तीने आत्महत्या केली. एका डॉक्टरचा व्हिडिओ समोर आला आहे. नेमकं काय झालं आहे समोर यायला हवं. त्याबरोबरच पुण्यात कोयता गँगचा त्रास वाढलाय. पोलिस यंत्रणा चांगली आहे परंतु, सरकार कमी पडत आहे. पोलिसांना मोकळीक मिळत नाही, त्यात हस्तक्षेप वाढत आहे. राज्याला या बाबी शोभा देणाऱ्या नाहीत, असे अजित पवार यावेळी म्हणाले.