सध्या लोकसभा निवडणुकीत अनेक दिग्गज स्वतःचं नशीब आजमावत आहेत. यातील एक नाव आहे ते म्हणजे बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगणा रणौत हिचं. बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौतही निवडणुकीच्या आखाड्यात आहेत. त्यांना भाजपने हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे सध्या कंगणा पूर्णवेळ प्रचारात गुंतलेली पहायला मिळतेय. या निवडणुकीत आपला दणदणीत विजय होईल, असा विश्वास कंगणा राणौतने आहे. मात्र, सोबतंच निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर आपण बॉलिवूडला रामराम करणार असल्याचंही कंगणा राणौतनं सांगितलं आबे.
कंगणा रणौत हिने एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत या गोष्टीवरून स्पष्टीकरण दिलं आहे. लोकसभेला निवडून आले तर बॉलीवूड सोडणार आहे. त्यानंतर पूर्णवेळ राजकारण करणार असल्याचं कंगणाने स्पष्ट केलं आहे. सिनेमा आणि राजकारण, हे कसं मॅनेज कारणार? या प्रश्नावर उत्तर देताना कंगनाने सांगितलं की, मी चित्रपटांमध्येही बोर होते.. मी रोलही करते आणि दिग्दर्शनही करते. जर मला राजकारणामध्ये करिअर दिसलं तर मग मी राजकारणच करेन. मी एकच आणि नेमकं काम करणार आहे.
कंगणा नेमकं काय म्हणाली?
”लोकांना माझी गरज आहे, असं जर मला वाटलं आणि लोक माझ्याशी जोडले गेले तर मग मी त्याच दिशेने काम करेन. मी जर मंडी लोकसभा जिंकले तर मी राजकारणात जाईन. मला काही फिल्ममेकर सांगतात की, राजकारणात जाऊ नको. परंतु जर तुम्हाला लोकांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या असतील तर राजकारणात यावं लागेल.” असं कंगना रणौतने सांगितले.
दरम्यान, कुठे ना कुठे आपण घराणेशाहीला राजकारण आणि चित्रपटांपुरतं मर्यादित ठेवलं आहे. घराणेशाही ही सगळ्यांचीच समस्या आहे आणि असलीच पाहिजे. या सगळ्यातून आपल्याला बाहेर आलं पाहिजे. आज मंडी मतदारसंघ माझा परिवार झाला आहे. कारण लोक मला ‘मंडी की बेटी’ म्हणून हाक मारत आहेत. हे माझं कुटुंब असून भावनेच्या आहारी नाही गेलं पाहिजे. असं म्हणत कंगणानं घराणेशाहीच्या मुद्द्यावरही उत्तर दिलं आहे.