काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या रूपाने मागील दहा वर्षांनंतर पहिल्यांदाच देशाला विरोधी पक्षनेता मिळाला आहे.या पदाचा असेलेला मान आणि शान काही वेगळीच असते.विरोधी पक्षनेते पदाला कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा असतो.विरोधीपक्षनेता म्हणजे शॅडो प्राईम मिनिस्टर असं म्हटलं जातं आणि हा मान राहुल गांधींना मिळाला आहे.याच निमित्त विरोधी पक्षनेत्याचे विशेषाधिकार..आणि राहुल गांधी यांच्या वाढलेल्या राजकीय ताकदीविषयी आपण या व्हिडिओतून जाणून घेऊ..
काँग्रेस खासदार राहुल गांधी आता विरोधी पक्षनेते झालेत. म्हणजेच विरोधकांचे प्रमुख म्हणून राहुल गांधी लोकसभेचा आवाज असतील. विशेष म्हणजे 10 वर्षांनी काँग्रेस किंवा विरोधकांना विरोधी पक्षनेता पद मिळालंय. कारण 2014 आणि 2019 मध्ये विरोधी पक्ष नेत्यासाठी आवश्यक संख्याबळ काँग्रेस अथवा इतर कोणत्याच विरोधी पक्षाकडे नव्हतं. पण आता लोकसभेत विरोधी पक्षांमध्ये सर्वाधिक 99 खासदार असलेल्या काँग्रेसनं राहुल गांधी यांचं नाव विरोधी पक्षनेते पदासाठी पुढं केलं. आणि त्यांची अधिकृत नियुक्ती देखील झाली. लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीचं नेतृत्व एकप्रकारे राहुल गांधींनीच केलंय. राहुल गांधींच्या सभा गाजल्या. संविधानाचा मुद्दा राहुल गांधींनी लावून धरला. आधी पायी भारत जोडो यात्रा नंतर न्याय यात्रेनं राहुल गांधी यांना विरोधी पक्षनेत्यापर्यंत पोहोचवलं. निवडणुकीत राहुल गांधीमुळं काँग्रेसचाच नाही तर इंडिया आघाडीचाही फायदा झाला आणि इंडियाचं संख्याबळ 235 पर्यंत पोहोचलं. राहुल गांधींनी यावेळी पाचव्यांदा खासदार होण्याचा मान मिळवला आहे. त्यांनी चार वेळा खासदार म्हणून वायनाडचे प्रतिनिधीत्व केले आहे. तर यावेळेस त्यांनी वायनाड आणि रायबरेली या दोन लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. दोन्ही ठिकाणी विजयी झाल्यानंतर त्यांनी खासदारकीसाठी रायबरेलीची निवड केली. आणि वायनाडच्या खासदारकीचा राजीनामा दिला. गांधी परिवारातून विरोधी पक्षनेते झालेले राहुल गांधी हे तिसरे सदस्य आहेत. याआधी सोनिया गांधी आणि राजीव गांधी यांनी विरोधी पक्षनेत्याची धुरा सांभाळली आहे.