इंदूर | भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने भारत-न्यूझीलंड एकदिवसीय मालिकेच्या तिसऱ्या व शेवटच्या सामन्यात शतक ठोकले. रोहितने 83 चेंडूत 9 चौकार आणि 6 षटकारमध्ये 100 धावा पूर्ण केल्या आहेत. अशा तऱ्हेने रोहितने आपला शतकांचा दुष्काळ अखेर संपवला.
रोहितने अखेरचे शतक 2 सप्टेंबर 2021 ला इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात ठोकले होते. त्याने शेवटचे वनडे शतक जानेवारी 2020 मध्ये बनवले होते. रोहितने तब्बल 16 महिन्यानंतर शतक बनवले. रोहितचा आलेला फॉर्म पाहता याचा फायदा भारताला यावर्षी होणाऱ्या विश्वकपमध्ये नक्की होईल असे सध्यातरी वाटत आहे.
इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवरील किवी संघाने नाणेफेक जिंकत पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताची सलामी जोडी रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांना सुरूवातीपासूनच चोप देण्यास सुरूवात केली होती. भारताच्या सलामीवीरांमुळे भारत आता चांगल्या स्थितीमध्ये आहे.