टीम इंडिया सध्या भारतात इंग्लंड विरुद्ध 5 कसोटी सामन्यांची मलिका खेळतेय. या मालिकेतील पहिले दोन सामने पूर्ण झालेत. या दोन सामन्यांपैकी एका सामन्यात भारतानं तर एका सामन्यात इंग्लंडनं विजय मिळवलाय. त्यामुळं सध्या मालिकेत दोन्ही संघ 1-1च्या बरोबरीत आहेत. आगामी काळातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप लक्षात घेता ही मालिका टीम इंडियासाठी महत्त्वाची आहे. या कसोटी सामन्यातील उर्वरित 3 सामन्यांसाठी आता बीसीसीआयनं संघ जाहीर केलाय.
इंग्लंडविरुद्ध शेवटच्या 3 कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गील, के एल राहुल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), के एस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप
या संघात के एल राहुल आणि रविंद्र जडेजा हे सध्या दुखापतग्रस्त आहेत. त्यामुळं त्यांच्या खेळण्यावर अजूनही संका आहे. त्याशिवाय फलंदाज श्रेयस अय्यरही दुखापतीमुळं संघातून बाहेर गेला आहे. अशावेळी भारतीय संघाला अनुभवी फलंदाजाची गरज असताना विराट कोहली वैयक्तिक कारणांमुळं शेवटच्या 3 सामन्यांसाठीही उपलब्ध राहणार नसल्याचं स्पष्टीकरण बीसीसीआयनं दिलं आहे.