भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर भारताचा हा पहिलाच सामना असणार आहे. यासोबतच नियमित टी-20 कर्णधार झाल्यानंतर सूर्यकुमार यादवचाही पहिलाच सामना आहे. दुसरीकडे, श्रीलंकाही नवा कर्णधार चारिथ असलंकाच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे. भारत टी-20 चा विश्वविजेता आहे त्यामुळे सध्या भारतीय संघाच्या कामगिरीकडे सर्वांची नजर असणार आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिका तीन सामन्यांची आहे. याच मैदानावर 28 जुलै रोजी मालिकेतील दुसरा सामना खेळवला जाणार आहे त्यानंतर मालिकेतील तिसरा आणि शेवटचा टी-20 सामना 30 जुलै रोजी येथे होणार आहे. 2 ऑगस्टपासून वनडे मालिका सुरू होणार असून दुसरा आणि तिसरा वनडे 4 आणि 7 तारखेला होणार आहे. एकदिवसीय सामने कोलंबोमध्ये खेळवले जातील. वनडेत भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वात मैदानात उतरेल.
कुठे आणि किती वाजता पाटता येणार सामना?
भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला T20 सामना स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. सोनी स्पोर्ट्स नेटवर्क वाहिनीवर तुम्ही या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहू शकता. त्याचे स्ट्रीमिंग पाहण्यासाठी तुम्हाला SonyLIV ॲप डाउनलोड करावे लागेल.
टी20 संघ खालीलप्रमाणे
भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अरविदीप सिंग, खलील अहमद, मोहम्मद सिराज.
श्रीलंका : चारिथ असालंका (कर्णधार), दिनेश चंडीमल, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटकीपर), पथुम निसांका, कुसल परेरा, वानिंदू हसरंगा, कामिंदू मेंडिस, दासुन शनाका, चामिंडू विक्रमसिंघे, बिनुरा फर्नांडो, अशिथा फर्नांडो, अशिथाना मादशान, मादशान, मादशान, दानिश , महेश थेक्षाना , दुनिथ वेललागे.