बीड | महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाप्रश्नावरून वादंग निर्माण होत आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी तीव्र निषेध केला असून, आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन हे जाणीवपूर्वक घडत आहे का? हे तातडीने न थांबल्यास मराठी माणसाच्या रक्षणासाठी पुन्हा एकदा आम्हाला सीमा ओलांडून जावे लागेल’, असा इशाराच दिला आहे.
बेळगावात महाराष्ट्रातील वाहनावर दगडफेक करण्यात आली. त्यानंतर वातावरण आणखीनच चिघळले आहे. विरोधकांकडून कर्नाटक सरकारविरोधात जोरदार निशाणा साधला जात आहे. त्यातच आता धनंजय मुंडे यांनी ट्विट करत इशारा दिला आहे. ‘कर्नाटकात महाराष्ट्रातील वाहनांवर झालेल्या हल्ल्यांचा तीव्र निषेध ! आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन हे जाणीवपूर्वक घडत आहे का? हे तातडीने न थांबल्यास मराठी माणसाच्या रक्षणासाठी पुन्हा एकदा आम्हाला सीमा ओलांडून जावे लागेल.’
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कर्नाटक सरकारला 24 तासांचा अल्टिमेटम दिला आहे. त्यांच्या या अल्टिमेटमनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व मंत्र्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारकडून यावर काय निर्णय घेतला जातो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.