नवी दिल्ली | नोकरदार वर्ग अनेकदा आपल्या कमाईतून बचत करत असतो. कारण भविष्य सुरक्षित राहावे हा यामागचा हेतू. पण अशी एक सरकारी योजना आहे जी दर महिन्याला 50 हजार रुपये पेन्शन देऊ शकते. त्यासाठी तुम्हाला दिवसाला फक्त 200 रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे.
गुंतवणूकीची ही योजना कोणतीही खाजगी नसून सरकारशी निगडित आहे. या स्कीमअंतर्गत तुम्हाला दर महिन्याला 6 हजारांची गुंतवणूक करावी लागणार आहे. त्यानुसार, तुम्हाला 60 वर्षानंतर दर महिन्याला 50 हजार रुपयांची पेन्शन मिळू शकते. म्हणजेच तुम्हाला दररोज 200 रुपयांची बचत करावी लागणार आहे.
या स्कीममध्ये गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीला करामध्येही सवलत मिळू शकते. एनपीएस गुंतवणुकीत 80C अंतर्गत सवलतीसह 80 CCD अंतर्गत अतिरिक्त 50 हजार रुपयांपर्यंत आयकरात सूटही मिळते.