मुंबई | भाजपच्या नेत्यांकडून सातत्याने महापुरुषांविषयी वादग्रस्त विधान करण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न वाद याच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीच्या वतीने मुंबईत महामोर्चाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या भगतसिंह कोश्यारींना मी राज्यपाल मानत नाही. भाजपमधील नेत्यांना बौधिक दारिद्र्य आलं आहे. या लफग्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही, असं विधान केल आहे.
दरम्यान, मुंबईतल्या मोर्चाच्या गर्दीने सत्ताधाऱ्यांचे डोळे उघडायला हवे. मात्र जर यांचे डोळे उघडले नाही, तर ते कधीच उघडू नये तसेच मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावरही ठाकरेंनी हल्लाबोल केला. त्यावर बोलत असताना लोढा यांनी गद्दारांच्या बंडाची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेशी केल्याने उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला.