पिंपरी चिंचवड | पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना पुन्हा शाईफेकेची धमकी देण्यात आली आहे. आज पाटील हे पवनाथडी येथे यात्रेसाठी येणार आहेत. हे पाहता त्यांना अशी धमकी देण्यात आली आहे. यामुळे पवनाथडी यात्रेच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे.
राष्ट्रवादीचे सोशल मीडिया अध्यक्ष विकास लोले, दशरथ बाबुराव पाटील यांच्याविरोधात भाजपचे माजी नगरसेवक हर्षल ढोरे यांनी गुन्हा दाखल केला आहे. द्वेष निर्माण करणे आणि धमकी देणे याबद्दल १५२, ५०५ कलमांतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
दरम्यान, संबंधित मजकूर असलेली पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली आहे. तसेच फेसबुकवर पोस्ट करून आणि व्हाट्सऍप स्टेट्स ठेवून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय म्हणून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पोस्ट मध्ये पाटलांच तोंड काळे केले रे… तसेच पत्रकार मित्रांनो आज पण चांगला अँगल घ्या असा इशारा देण्यात आला आहे.