पुणे | सेंटर फॉर एक्सीलेंस अंतर्गत जीतो पुणे लेडीज विंगच्या वतीने ३ दिवसीय प्रोफेशनल नेल टेक्निशियन तसेच ‘ग्लॅम बाय परिता’च्या संस्थापक परिता मेहता यांच्या नेल आर्ट कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. प्रथमच जीतो पुणे लेडीज विंगच्या वतीने १२,१३ आणि १४ डिसेंबर रोजी ही कार्यशाळा आयोजित केली.
नेल टेक्निशियन परिता यांनी स्वतः नेल आर्ट करीत उपस्थित महिलांना अगदी सोप्या भाषेत नेल आर्टचे प्रकार, त्याची पद्धत, कमी वेळामध्ये आपल्याला प्रेस ऑन नेल (१० नखांचे संच) बनवणे, तसेच नेल आर्ट मधील ८ विविध प्रकार आणि नेल आर्ट संबंधीतल्या लहान लहान गोष्टींचे मागर्दर्शन केले. जवळपास ६० महिला या कार्यशाळेत सहभागी झाल्या होत्या. प्रत्येक स्त्रीला तिच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी तसेच नवोदित महिला उद्योजक होण्यासाठी परिता यांनी यावेळी संबोधित केले.
या कार्यशाळेचे संयोजक एकता भन्साळी, तर सह संयोजक स्मिता भटेवरा आणि जीतो पुणे लेडीज विंग पुणे टीम यांनी केले. परिता यांचा सत्कार अध्यक्षा डॉ. लकीशा मार्लेचा, मुख्य सचिव मोना लोढा, सचिव नयना खिवंसरा आणि खजिनदार रिता जैन यांच्या हस्ते करण्यात आला.