कोची मिनी लिलाव २०२३ या लिलावात मोठा इतिहास घडला. या लिलावात इंग्लंडचा सॅम करनवर पंजाब किंग्जने 18.50 कोटी रूपयांची बोली लावली. तर ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीनला मुंबई इंडियन्सने 17.50 कोटींमध्ये विकत घेतले. असा हा नवीन इतिहास घडला.
एकेकाळचे आयपीएलचे स्टार खेळाडू अजिंक्य राहणे, केन विल्यम्सन, शाकिबलअल हसन यांसारख्या खेळाडूंना मागे टाकत अनकॅप्ट खेळाडूंनी कोटींची उडान घेतली. भारतीय अनकॅप्ट खेळाडूंचा लिलाव सुरू झाल्यानंतर फ्रेंचायजींनी आखडता हात घेतला होता. मात्र, अखेर शिवम मावीसाठी चुरशीने बोली लावली गेली. अखेर गुजरात टायटन्सने शिवम मावीला तब्बल 6 कोटींची बोली लावत खरेदी केले.
मुकेश कुमारसाठी दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज या दोघांमध्ये जोरदार बॅटिंग झाली. अखेर दिल्ली कॅपिटल्सने मुकेशला 5.50 कोटीत खरेदी केले. मुकेश कुमार हा आयपीएलचा कोणताही करार हातात नसतानाही भारतीय संघात निवडला गेला होता. मात्र, दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मायदेशात झालेल्या मालिकेत त्याला अंतिम 11 मध्ये खेळण्याची संधी मिळाली नव्हती. जरी त्याला अनकॅप्ट खेळाडू म्हणता येत नसले तरी त्याने अखेर आयपीएलचा करार मिळावला आहे.
दिल्ली कॅपिटल्सने 5.50 कोटींची बोली लावत त्याला आपल्याकडे खेचले व एकेकाळच्या स्टार खेळाडूला मागे टाकत या अनकॅप्ट खेळाडूंनी कोटींची उडान घेतली.