कोची |: विश्वकप विजेता इंग्लंडचा स्टार अष्टपैलू सॅम करनने (Sam Curran) इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) एक ऐतिहासिक विक्रम केला आहे. आयपीएल 2023 हंगामासाठी कोची येथे झालेल्या मिनी लिलावात इतिहासातील सर्वात मोठी बोली करनवर लागली. पंजाब किंग्जने 18.50 कोटी रुपयांची बोली लावून विकत घेतले.
२४ वर्षीय करनने दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरिसचाही विक्रम मोडत आयपीएमध्ये विश्वविक्रम केला. त्याच्या पाठोपाठ ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीन, हा करन नंतरचा सगळ्यात महागडा खेळाडू ठरला. त्याला मुंबई इंडियन्सने 17.50 कोटीला विकत घेतले. विराट, रोहित, धोनी यांसारख्या दिग्गजांना मागे टाकत या युवा अष्टपैलू खेळाडूंनी आपल्या नावावर एक नवा विक्रम नोंदवला.
T20 विश्वचषकात सॅम करन ठरला होता हिरो
वेगवान गोलंदाज, अष्टपैलू सॅम करन यावर्षी ऑस्ट्रेलियाने आयोजित केलेल्या T20 विश्वचषकात हिरो ठरला. करनने स्वबळावर इंग्लंडला चॅम्पियन बनवले. करन विश्वचषकात ‘प्लेअर ऑफ द मॅच’, ‘प्लेअर ऑफ द सिरीज’चा किताब मिळाला होता. त्याचे हे प्रदर्शन पाहून त्याच्यावर आयपीएलमधील सर्व फ्रँचायजींचे लक्ष होते. त्याला त्याच्याच जुन्या फ्रँचायजी पंजाबने बोली लावत त्याला आपल्या गोटात पुन्हा सामील केले.