बारामती | राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) हे सध्या बारामती दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीतील खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी विधान केले. ”जे कोणी नेते बारामतीमध्ये येतात. त्या सर्व नेत्यांचे आम्ही स्वागतच केले आणि त्यांचेही अर्थात स्वागतच होईल”, असे त्या म्हणाल्या.
काही दिवसांपूर्वी अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर सत्तार आता बारामती दौऱ्यावर येत आहेत. सत्तारांच्या या दौऱ्यावर सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, ”जे कोणी नेते बारामतीमध्ये येतात. त्या सर्व नेत्यांचे आम्ही स्वागतच केले आहे आणि त्यांचेही अर्थात स्वागतच होईल. आमच्यावर अतिथी देवो भव असे संस्कार झाले आहेत. त्यामुळे जे येतील त्यांचे स्वागत असल्याचे सुळे यांनी म्हटले आहे.
कसबा, चिंचवड बाबत लवकरच निर्णय घेऊ : सुप्रिया सुळे
कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीची तारीख आयोगाकडून जाहीर करण्यात आली आहे. या दोन्ही निवडणुका पक्षातील वरिष्ठ नेते बैठक घेऊन लवकरच निर्णय जाहीर करणार असल्याचे सुप्रिया सुळेंनी सांगितले.