पुणे । राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शिंदे-फडणवीस सरकारला टोला लगावला होता. “लहान बालकाच्या जन्मालाही इतका वेळ लागत नाही”, म्हणत अजित पवार यांनी सरकारवर टीका केली.भाजप नेत्या मेधा कुलकर्णी, यांनी आज पुण्यात एका कार्यक्राचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळेस पत्रकारांनी अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याविषयी विचारले तेव्हा, राणे म्हणाले, “मुलं होण्याचा आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा काय सबंध? अजित पवार यांना ती प्रोसेस माहित आहे. त्यांनी मंत्री असताना स्वत: काय केलं? त्याची चौकशी सुरू आहे”.
“राज्यसरकाला ७ महिने झाले तरी अजून राज्यात मंत्रिमंड्ळाचा विस्तार केला नाही मंत्रिमंडळात २० लोक आहे. या मंत्रिमंडळात महिलांला स्थानच नाही. राज्यात कर्तृत्वान महिला नाहीत का? फक्त म्हणता, महिलांला संधी देऊ पण, देत नाहीत”. सत्ताधाऱ्यांना लक्ष करत, “७ महिने झाले, ९ महिन्यात तर बाळ पण जन्माला येतं. यांना साधा मंत्रिमंडळाचा विस्तार करता येत नाही”, अशी खोचक टीका राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली होती. हिंगोलीतील सभेत अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष केले होते. यावरच टिपण्णी करताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अजित पवार यांचा समाचार घेतला.