कोल्हापूर | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कणेरी मठावर होत असलेल्या पंचमहाभूत लोकोत्सवाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकार शशिकांत वारिसे हत्याप्रकरणात आपली भूमिका स्पष्ट केली. कोणालाही पाठीशी घालणार नाही, आरोपीला कायद्याने शिक्षा होणारच असे ते म्हटले आहेत.
पत्रकार आपला जीव धोक्यात घालून काम करतात. हा लोकशाहीवर झालेला हल्ला आहे. या प्रकरणातील आरोपीला अटक केली आहे. त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला कायद्यानुसार शिक्षा होणारच असल्याचे त्यांनी म्हटले.
दरम्यान, जे दोषी असतील त्यांना पाठीशी घालू नका असा विरोधकांना टोला देखील त्यांनी लगावला आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी गठित करण्याचे निर्देश दिले आहेत. फडणवीस यांनी वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एसआयटी गठित करण्याचे आदेश पोलिस प्रशासनाला दिले आहेत.