आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या भारतीय जनता पक्ष ॲक्शन मोडवर आल्याचं पहायला मिळतंय. देशाचे पंचप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे ेका मागोमाग एक महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार असल्याची माहिती समोर आलीये. विशे, म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अवघ्या महिन्याभरापूर्वी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते. त्यानंतर पुन्हा एकदा मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असल्यामुळं चर्चांना उधाण आलंय.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा विदर्भ दौऱ्यावर
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे फेब्रुवारी महिन्यात विदर्भाच्या दौऱ्यावर येणार आहेत. 15 फेब्रुवारी रोजी अमित शहा अकोला दौऱ्यावर येणार असल्याची माहिती समोर आलीये. मिळालेल्या माहितीनुसार पश्चिम विदर्भामध्ये लोकसभा मतदारसंघांमध्ये अमित शाह कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. यामध्ये अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी अमित शाह यांचा संवाद साधणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मागील महिन्यातच महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी अनेक विकास कामांचं लोकार्पण करून नाशिकच्या काळाराम मंदिरात जाऊन स्वच्छता मोहीम राबविली होती. आता पुन्हा एकदा नरेंद्र मोदी शिवजयंतीच्या दिवशी अर्थात 19 फेब्रुवारीला महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राजधानी साताऱ्यातील राजघराण्याच्या वतीने देण्यात येणारा सर्वात मानाचा पहिला शिवसन्मान पुरस्कार देण्यात येणार आहे. यासंदर्भात काही दिवसांपूर्वीच उदयनराजे भोसले यांनी घोषणा केली होती. याशिवाय 19 फेब्रुवारीला नरेंद्र मोदींच्या हस्ते कोस्टल रोडचं देखील लोकार्पण होणार असल्याची माहिती समोर आलीये. त्यामुळेच आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेता मोदी- शहांचे महाराष्ट्र दौरे वाढल्याच्या चर्चा सगळीकडे सुरू झाल्यात.