मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका टिपण्णी करताना दिसत आहे अशातच आता सिंधुदुर्गातील एका कार्यक्रमात भाजपचे राज्यसभेचे खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “कोण तरी भास्कर जाधव आणला भाडोत्री माझ्यावर टीका करण्यासाठी मी त्यांच्यावर काही बोलणार नाही पण एक दिवस चोप मात्र नक्की देणार, असे नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
ज्या भास्कर जाधवांना बाळासाहेब ठाकरे यांना सांगून आमदारकीचे तिकीट दिलं. तसेच निवडणुकीसाठी 15 लाख रुपये दिले त्या भास्कर जाधवांना याचा विसर पडला आहे. माझ्या जिल्ह्यात येऊन माझ्यावर टीका करतो असंही राणे यावेळी म्हटले.
दरम्यान, कणकवली येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या सभेत नेपाळी वॉचमनचा मुलगा दम देतो अशी भास्कर जाधवांनी राणेंवर जहरी टीका केली होती. शिवाय भास्कर जाधवांनी नारायण राणेंचा नाव न घेता कोंबडी चोर असा उल्लेख केला होता. ज्यांनी उद्धव ठाकरेंना धोका दिला त्यांना धडा शिकवा, असेही जाधव म्हणाले होते.