राज्यात मराठा आरक्षणाचा विषय पेटला तेव्हापासून राज्यात अनेक राजकीय आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळाले. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे आमदार व मंत्री छगन भुजबळ आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये अनेक वेळा मराठा ओबीसी आरक्षणावरून खडाजंगी पाहायला मिळाली. त्यातच आता पुन्हा एकदा मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केले आणि त्याला मनोज जरंगेंनी देखील प्रत्युत्तर दिले.
ज्यावेळी अंतरवाली सराटीत दगडफेक झाली आणि त्यानंतर जो लाठीचार्ज झाला. त्यावेळी मनोज जरांगे तिथून निघून गेले होते. रात्री दोन वाजता राष्ट्रवादीचे एक स्थानिक आमदार आणि रोहित पवार तेथे गेले. या दोघांनी परत तिथे आणून त्यांना बसवले. असा दावा मंत्री छगन भुजबळ यांनी केला होता. त्यांच्या याच दाव्याला मनोज जरंगेंनी उत्तर देत, छगन भुजबळांना वेड लागलय. त्यांना आरोप करण्यापलिकडे काय करता येत नाही. आरोप करताय तर सिद्ध करा. देवेंद्र फडणवीसांची शक्ती तुमच्यामागे आहे. तसेच त्यांचं आम्ही आता काही मनावर घेत नाहीत. छगन भुजबळांना गोरगरिब मराठ्यांमध्ये आणि ओबीसींमध्ये दंगली घडवायच्या आहेत. सध्या देवेंद्र फडणवीसांचे आमदार म्हणत आहेत, सध्या मणिपूरसारखी परिस्थिती होणार आहे. यांना शिक्कामोर्तब केलाय, दंगली घडवून निवडणुका लढवायच्या आहेत. त्याचप्रमाणे छगन भुजबळ हा महापापी माणूस आहे. गोरगरीब मराठ्यांमध्ये आणि ओबीसींमध्ये यांना दंगली घडवायच्या आहेत. परंतु आम्ही सर्वजण एकत्र आहोत. आमच्या आंदोलनापुढे आंदोलन आणून बसवणार आहेत. हे महापाप या वयात तो करायला लागलेत आपण किती ज्येष्ठ आहोत, पक्षात किती मोठे आहोत. आपण विचारांची मांडणी किती पुरोगामीपणाने केली पाहिजे. हे त्यांचा लक्षात नाही, त्यांना फक्त दंगली घडवायच्या आहेत. असे मनोज जरांगे म्हणाले.