- ‘पीएम किसान सम्मान सम्मेलन 2022’ मध्ये ‘बासिलिया ऑरगॅनिक्स’चा सहभाग
पुणे | शर्मिला ओसवाल आणि त्यांचा मुलगा शुभम या पुण्यातील माय-लेकराच्या ‘बसिलिया ऑरगॅनिक्स’ या स्टार्टअप उपक्रमाचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. या स्टार्टअपमध्ये माय-लेकराच्या जोडीने उत्कृष्ट कामगिरी केल्याने पंतप्रधान मोदींनी कौतुक केले. याशिवाय त्यांच्या विविध उत्पादनांच्या उत्पादन प्रक्रियेचे पंतप्रधानांनी कौतुक केले आणि अॅग्रिटेक स्टार्टअप संस्थेला त्यांचे उत्पादन परदेशी बाजारपेठेत निर्यात करण्यासाठी प्रोत्साहित केले.
‘पीएम किसान सम्मान सम्मेलन 2022’चे दोन दिवसीय प्रदर्शन भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या (IARI) पुसा मेळा मैदानावर 17 आणि 18 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी या प्रदर्शनाला भेट दिली आणि कार्यक्रमादरम्यान केवळ पाच स्टार्टअप्सशी संवाद साधला. यावेळी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. या प्रदर्शनात 1500 पेक्षा जास्त कृषी स्टार्ट अपचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. त्यामध्ये त्यांची उत्पादने आणि अचूक शेती, संलग्न शेती, प्रगत शेती उपाय, शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञान, सेंद्रिय कचऱ्यापासून मौल्यवान संपत्तीचे रूपांतरण तसेच कृषी-लॉजिस्टिक्सशी संबंधित नावीन्यपूर्ण प्रदर्शन केले गेले.
या प्रदर्शनात शर्मिला ओसवाल आणि शुभम ओसवाल यांच्या स्टार्टअपचे पंतप्रधान मोदींकडून कौतुक करण्यात आले. ओसवाल माय-लेकराच्या नेतृत्वाखाली एक बाजरी स्टार्टअप उपक्रमाचे उत्कृष्ट कामगिरी करणार्या स्टार्टअप उपक्रमांमध्ये प्रशंसा करण्यात आली. हे दोघेही सामाजिक उद्योजक आहेत. जे पौष्टिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी तसेच देशाच्या आरोग्य, सामाजिक कार्यक्रमास मदत करतात. हा स्टार्टअप सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या स्टार्टअप संस्थांपैकी एक असल्याचे यावेळी अधोरेखित झाले.
यावेळी कृषीमंत्री तोमर म्हणाले, ‘कृषी क्षेत्रात पुढे जायचे असेल, तर तुम्हाला आव्हाने ओळखून त्यावर मात करावी लागेल. म्हणूनच माय-लेकराचा हा स्टार्टअप उपक्रम लोकांना ‘भारत मिलेट मिशन’च्या माध्यमातून शाश्वत उपजीविका सुरू करण्यासाठी प्रेरित करेल याची खात्री आहे’, असा विश्वास व्यक्त केला.