वॉशिंग्टन | आपण कुठंही अज्ञात ठिकाणी जात असताना अनेकदा ‘गुगल मॅप्स’चा (Google Maps) वापर करत असतोच. हे गुगल मॅप्स जीपीएस म्हणजेच ‘ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम’वर काम करते. पण याच गुगल मॅप्सचा वापर करताना अमेरिकेत अपघात घडल्याची घटना घडली आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला. फिल पॅक्ससन असे या व्यक्तीचे नाव आहे.
फिल पॅक्ससन हा त्याच्या मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी कारने गेला होता. वाढदिवस साजरा करून परतत असताना त्याने रात्री गुगल मॅप्सचा वापर केला. नंतर नेव्हिगेशन सिस्टिमने त्यांना चुकीच्या दिशेने वळवले. त्याची कार वळण घेत असताना तिथे कोणतेही बॅरिकेड्स नव्हते. त्यामुळे रात्रीच्या वेळेस कार तुटलेल्या पुलावरून खाली पडली आणि फिल याचा मृत्यू झाला.
दशकापूर्वी कोसळला होता पूल
एक दशकापूर्वी हा पूल कोसळला असल्याची माहिती आता दिली जात आहे. त्यानंतर या पुलाची कोणतीही दुरुस्ती केली गेली नाही. या पुलावर कोणतीही चिन्हे किंवा सुरक्षितता संबंधी माहिती गुगल मॅप्सच्या माध्यमातून मिळाली नव्हती. त्यामुळे फिल याला पुढील अडथळा आला आणि अपघात झाल्याचे म्हटले जात आहे.