बेंगळुरू : 17 डिसेंबर रोजी एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू येथे झालेल्या अंध T20 विश्वचषक २०२२ च्या फायनलमध्ये भारताने बांगलादेश चा १२० धावानी पराभव केला. आणि T20 विश्वचषक जिंकला भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना बांगलादेश समोर २७७ /२ धावाचे आव्हान ठेवले त्याचा पाठलाग करत बांगलादेश केवळ १५७/ ३ धावा केल्या.
यापूर्वी 2017 मध्ये झालेल्या T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता. त्यासामन्यात पाकिस्तानने प्रथम खेळताना 8 गड्यांच्या मोबदल्यात 197 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने एक विकेट गमावून लक्ष्य गाठले. भारताने 9 गडी राखून विजय मिळवला होता.
दरम्यान, 2012 मध्येही भारताने विजेतेपदावर कब्जा केला होता. भारताच्या ब्लाइंड संघाने एकदिवसीय विश्वचषकाचे विजेतेपदही दोनदा जिंकले आहे. यातून स्पष्ट होते की भारत सर्वबाजूनी क्रिकेट मध्ये परिपूर्ण झालेला आहे.