पंढरपूर | राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले. हे सरकार स्थापन होऊन जवळपास सहा महिने होत आहे. त्यात आता भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी सरकारला टोला लगावत घरचा आहेर दिला. हे सरकार अनैतिक आहे, असे ते म्हणाले.
पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सरकारमुक्त करण्याबाबत चर्चा करण्यासाठी सुब्रमण्यम स्वामी पंढरपूरमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पत्रकारांनी त्यांना महाराष्ट्राचे सरकार संवैधानिक पद्धतीने तयार करण्यात आले का?, असा सवाल केला. त्यावर स्वामी म्हणाले, ‘हे सरकार पाडून तयार करण्यात आले आहे आणि ते अनैतिक आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे’.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले आहे. यावरुन ठाकरे गटाकडून सरकारवर सातत्याने टीका करण्यात येत आहे.