पुणे | पुणे जिल्ह्यातल्या अकोले गावातील श्रीकांत रमेश दराडे यानं विक्री कर निरीक्षक परीक्षेत राज्यात १७ वा क्रमांक पटकावित स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवले. तर शेजारच्याच डाळज नं. २ गावातील धर्मराज भाऊसाहेब पानसरे यानेही याच परीक्षेत यश मिळवले आहे. हे दोघेही खुल्या गटातून उत्तीर्ण झाली आहेत. या दोघांच्याही यशाचं कौतुक होत असून, त्यांच्यावर विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्य विक्रीकर निरीक्षक परीक्षेचा निकाल नुकताच लागला. ही परीक्षा ६०९ पदांकरीता घेण्यात आली होती. अकोले गावातील श्रीकांत रमेश दराडे याने या परीक्षेत १७ वा क्रमांकाने उत्तीर्ण होत यश मिळवले आहे. धर्मराज भाऊसाहेब पानसरे याने १११ वा क्रमांक मिळवला आहे.
बेभरवशाची शेती आणि शिक्षणाचा अभाव असलेल्या कुटुंबात जन्मलेल्या या दोन्ही मुलांनी यश मिळवल्याने त्यांचं विशेष कौतुक केले जात आहे. त्यांचं हे असायलाच हवं. स्पर्धा परीक्षा हे तसं बेभरवशाचं क्षेत्र आहे. कधी कोणता निर्णय होईल? आणि कोणत्या कारणानं परीक्षा पुढे जाईल याचा नेम नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची पोरं गावखेड्यातून पुण्यासारख्या शहरात येऊन अभ्यास करतात. त्यातून ते अशाप्रकारे यश संपादन करतात, हे खरंच कौतुकास्पद आहे.