मुंबई | योगगुरु बाबा रामदेव (Baba Ramdev) यांनी महिलांबाबत वादग्रस्त विधान केले आहे. ”साडीमध्ये महिला चांगल्या दिसतात, सलवार सूटमध्ये चांगल्या दिसतात, माझ्या नजरेने पाहिलं, तर काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात”, असे वक्तव्य त्यांनी केले.
ठाण्यातील एका योगा कार्यक्रमात बाबा रामदेव बोलत होते. योगा कार्यक्रमानंतर लगेच महिलांसाठी महासंमेलन सुरू करण्यात आले होते. त्यामुळे महिलांना साड्या नेसायला वेळच मिळाला नाही. त्याविषयी बोलताना बाबा रामदेव यांनी हे विधान केले. ते म्हणाले, ”साड्या नेसायला वेळ नाही मिळाला, तरी काही समस्या नाही. आता घरी जाऊन साड्या नेसा. महिला साड्या नेसून पण चांगल्या वाटतात. महिला सलवार सूटमध्ये सुद्धा चांगल्या वाटतात आणि माझ्या नजरेने काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात.” .
दरम्यान, बाबा रामदेव यांनी याच कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे तोंडभरून कौतुक केले. ”अमृता फडणवीस यांना तरुण राहण्याची प्रबळ इच्छाशक्ती आहे. त्या शंभर वर्षापर्यंत म्हाताऱ्या होणार नाहीत. त्या नेहमीच तोलून मापून खातात, खुश राहतात, जेव्हा पाहावं तेव्हा लहान मुलांप्रमाणे हसत असतात”, असे विधान त्यांनी केले.