मुंबई | बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान (Shah Rukh Khan) याला सीमा शुल्क विभागाने (कस्टम) मुंबई विमानतळावर रोखले. इतकेच नाही तर त्याच्याकडून 7 लाखांचा दंडही वसूल केला. याबाबतची माहिती विमानतळ प्रशासनाच्या सूत्रांकडून देण्यात आली.
शाहरूख खान हा शारजाह येथून मुंबईत विमानाने आला. मुंबई विमानतळावर त्याला सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी रोखले. त्याची सुमारे एक तास चौकशी केली. शाहरूख खानजवळ महागड्या घड्याळांचे कव्हर आढळले. या कव्हरची किंमत जवळपास 18 लाख रुपये इतकी होती. शाहरूखने कस्टम ड्युटी भरली नव्हती. त्यामुळे कस्टमच्या अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी केली. त्याला 6 लाख 83 हजार रुपयांची कस्टम ड्युटी भरण्याचे सांगण्यात आले. जेव्हा शाहरूख खान याने कस्टम ड्युटी भरली, त्यानंतर त्याला सोडून देण्यात आल्याचे सांगण्यात आले.