मोफत आयोग्य शिबिराचे आयोजन
पुणे । डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रात प्रथमच दि. १ ते २० जून रोजी गर्भाशयाच्या कॅन्सर संबंधीत मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरासाठी नाव नोंदणी करणे आवश्यक असून यामध्ये गर्भाशयाची तपासणी करून गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होऊ नये म्हणून HPV या लसीचे मोफत लसीकरण करण्यात येणार आहे.
वयवर्षे ९ ते २० या वयोगटातील मुलींकरीता याचं लसीकरण केलं जातं. त्यापेक्षाही अधिक वयोगटातील महिलांना देखील ही लस दिली जाते. परंतु त्यांना ही लस दोनवेळा दिली जाते. तर ९ ते २० या वयोगटातील मुलींना ही लस एकदाच देण्यात येते. जर याकडे दुर्लक्ष झालं तर मात्र हा विषाणू जास्तीत जास्त वाढण्याचा धोका वाढतो. त्यामुळे याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. त्यामुळे यावर वेळीच लसीकरण करणे देखील तितकेच महत्वाचे आहे.
दरम्यान, गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर का होतो ? कसा होतो ? याविषयी शिबिराच्या प्रमुख डॉ. श्रद्धा जवंजाळ यांनी फॉर द पीपलशी बोलताना अधिक माहिती दिली.
अधिक माहितीसाठी 8208600030 या क्रमांकावर संपर्क करा. तसेच https://forms.gle/niJ57mWUQhQ9srS29 या लिंकवरून फॉर्म भरा आणि या शिबिराचा जास्तीत जास्त मुलींनी /महिलांनी लाभ घ्या असे आवाहन शिबिराच्या प्रमुख डॉ. श्रद्धा जवंजाळ यांनी केले आहे.