पुणे | जीतो पुणे आणि जैन कल्याणम् मॅट्रीमोनी यांच्यातर्फे आज जैन समाजाच्या सर्व धर्माच्या मुलामुलींकरिता डिजिटल बायोडाटा बँक या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जैन कल्याणम् मॅट्रीमोनी यांच्याकडे तब्बल २०,००० बायोडाटा आहेत. योग्य साथीदार मिळण्याकरिता उमेदवार आणि त्यांच्या पालकांच्या अपेक्षा समजून घेऊन त्याप्रमाणे त्यांच्या मनपसंतीचा जोडीदार कसा मिळेल याविषयी माहिती देण्यात आली.
सध्याच्या काळात योग्य साथीदार निवडणं हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने जीतोचा संघ काम करत आहेत. तसेच डिजिटल बायोडाटा बँक म्हणजे लग्नाच्या वयात आलेल्या जवळपास २० हजाराहून अधिक मुलामुलींचा डाटा जमा करून त्यातून आपल्याला आवडेल तो जोडीदार आपल्याला निवडणे शक्य होणार आहे. ही संकल्पना केवळ शहरापुरती मर्यादित न ठेवता ती गावखेड्यात पोहचावी असा देखील जीतोचा प्रयत्न आहे असे जीतो श्रमन आरोग्यमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विजय भंडारी यांनी सांगितले.
त्याचबरोबर, योग्य वयात लग्न व्हावे या हेतूने जीतो पुणे प्रयत्न करीत आहे. जीतो पुणे यांच्या वतीने २५ आणि २६ फेब्रुवारीला देखील ऑनलाईन परिचय संमलेन आयोजित केला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी यामध्ये सहभाग घ्यावा असे जीतो पुणे बोर्डचे सदस्य व जीतो मॅट्रीमोनीचे डायरेक्टर इन्चार्ज सचिन जैन यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
सध्याच्या युगात डिजिटल बायोडाटा पाहून मुले मुली फक्त फोटो पाहून लग्न ठरवतात परंतु तसे न घडता एकमेकांविषयी जाणून घेऊन, चौकशी करून योग्य साथीदार निवडणे याकडे विशेषतः लक्ष दिले पाहिजे असे जीतो पुणे मॅट्रीमोनीचे कन्वेनियर सुनील सांकला यांनी सांगितले.
ज्यांना एका ठिकाणाहून दुसरीकडे जाणे शक्य होत नाही प्रत्येक गोष्ट तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करणे सहज सोपे व्हावे यासाठी आम्ही डिजिटल बायोडाटा बँक आणले आहे. ज्यामध्ये सहजपणे आपल्याला आपल्या आवडीचा बायोडाटा निवडून योग्य तो जोडीदार मिळणे सोपे होणार आहे असे जीतो पुणे मॅट्रीमोनीचे को-कन्वेनियर अमित लोढा यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात लोकांचा प्रतिसाद मिळाला. जवळपास ६० अर्जांची नोंद यावेळी करण्यात आली.
तसेच जीतो श्रमन आरोग्यमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विजय भंडारी, जितो पुणेचे अध्यक्ष राजेश सांकला, मुख्य सचिव चेतन भंडारी, किशोर ओसवाल, दिलीप मेहता, सुनील देसर्दा यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तर प्रमुख उपस्थिती म्हणून जीतो पुणे लेडीज विंगच्या अध्यक्ष लकीशा मर्लेचा , मुख्य सचिव मोना लोढा हे उपस्थित होते. यावेळी सचिन जैन, सुनील सांकला, अमित लोढा, रेशमा भंडारी, प्रीती रायसोनी, नीता मेहता, मिठलाला जैन, प्रियंका परमार, सुरज बोरा, प्रवीण ताथेड, सरिता जैन, कमलेश जैन, प्रीती बरमेचा, आकाश श्रीश्रीमल, अनिकेत शोंड यांनी विशेष परिश्रम घेतले.