पुणे : जीतोच्या व्यासपीठावर युवकांसाठी कॉफी टेबल कमिटी राज मुच्छाल यांच्यासोबत घोटाळ्यांच्या युगात नीतिशास्त्र या विषयावरील संवादात्मक चर्चा सत्रात आयोजित करण्यात आले.
जीतो श्रमण आरोग्यम चे राष्ट्रीय उपाध्यक्ष व पुणे युथ विंग चे मार्गदर्शक विजय भंडारी, जीतो पुणे चे अध्यक्ष राजेश सकला, जीतो पुणे चॅप्टर चे मुख्य सचिव चेतन भंडारी, दिनेश ओसवाल सचिव जीतो पुणे, किशोर ओसवाल कोषाध्यक्ष जीतो पुणे, संदीप लुणावत संयोजक जीतो पुणे युथ विंग, जिनेश जैन – सचिव जीतो राष्ट्रीय युथ विंग, सिद्धार्थ गुंदेचा – मुख्य सचिव जितो पुणे युथ विंग, कॉफी टेबल मीट कमिटी – रीचा लुणावत, समवेद सोलंकी, ईशा ओस्तवाल व कमिटी यांच्या संकल्पनेतून हे चर्चा सत्र आयोजित करण्यात आले.
या सत्राला युवकांचा देखील मोठा प्रतिसाद होता. राज मुछाळ यांनी मार्गदर्शन करताना युवकांना व्यवसाय कसा करावा व्यवसायातील संधी याविषयी माहिती दिली.
या सत्राचा परिणाम तुम्हाला पुढील एका वर्षात तुमच्या बँक खात्यात दिसून येईल. कोणती ही गोष्ट करताना ती आपण का करतो? कशासाठी करतो? याची योग्य वेळ काय? याकडे लक्ष दिले पाहिजे असेदेखील त्यांनी यावेळी सांगितले.
तसेच माझे मार्गदर्शक म्हणून विजय भंडारी यांच्याकडे पाहतो ते माझे मार्गदर्शक आहे असेदेखील मुछाळ यांनी सांगितले.
तुम्ही तुमच्या जीवनात तुमचा मार्ग व मार्गदर्शक ठरवून पुढे गेले पाहिजे . हे सत्र संपल्यानंतर पुणे चे अध्यक्ष राजेश सांकला यांनी व्यवसाय मार्गदर्शक राज मुछाळ यांचे जीतो पुणे यांच्यातर्फे आभार मानले. तसेच मुछाळ यांनी युवकांना पुढील व्यावसायिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.