पुणे | लायन्स क्लब ऑफ इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234D2 यांच्या वतीने सोमवारी पुण्यातील डेक्कन जिमखाना येथील पीवायसी क्लब याठिकाणी ‘मन की बात गव्हर्नर के साथ’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रांतपाल म्हणून लायन विजय भंडारी यांची लायन्स क्लब ऑफ इंटरनॅशनल डिस्ट्रीक्ट ३२३४डी२ वर नवनियुक्ती झाली आहे. यानिमित्ताने या डिस्ट्रिक्ट ३२३४डी२ अंतर्गत येणाऱ्या क्लबच्या पदाधिकाऱ्यांसोबत प्रांतपाल विजय भंडारी यांच्या मन की बात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मनातील शंकाचे निरसन व्हावे, संस्थेसाठी काही सूचना असतील तर त्या मनमोकळेपणाने सांगाव्या तसेच संस्थेला येणाऱ्या काळात चांगले उपक्रम राबवता यावे हा यामागचा उद्देश होता.
वृक्ष लागवड, शिक्षण, महिला, ज्येष्ठ नागरिक, गेवराई, डेंटल क्लिनिक, आदिवासी, नदी स्वच्छता, सीएसआर फंड, पिण्याचे पाणी, एक मुठ्ठी अनाज अशा अनेक बाबतीत उपस्थित मान्यवरांकडून सूचना यावेळी मांडण्यात आल्या. या कार्यक्रमास 91 लायन्स क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.
सर्वांना सोबत घेऊन काम करणार!
“डिस्ट्रिक्ट ३२३४डी२ तर्फे येत्या वर्षभरात शिक्षणाबरोबरच वृक्ष लागवड आणि इतर महत्वाच्या विषयांवर भरीव काम करण्याचा मानस आहे. सर्वांना सोबत घेऊन प्रत्येक क्लबच्या उपक्रमात डिस्ट्रिक्टतर्फे भरीव योगदान देण्याचा प्रयत्न राहणार आहे. एकत्र काम केले तर, त्याचे फायदे सर्वोत्तम असतील. डिस्ट्रिक्टच्या वतीने डिस्काऊंड कार्ड देण्यात येणार आहे. यामध्ये नोंदणी असलेल्या ठिकाणी या कार्डमुळे खरेदीवर डिस्काऊंड मिळणार आहे.”
- लायन विजय भंडारी (प्रांतपाल, लायन्स क्लब ऑफ इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४डी२)
याप्रसंगी लायन्स क्लब ऑफ इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४डी२ च्या पिनचे उद्घाटन झाले. तसेच, डिस्ट्रिक्टच्या वतीने सर्व क्लबच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती प्रसिद्ध करणारा लायन्स न्यूज चॅनल सुरु करण्यात आला आहे. हा चॅनल फेसबुक, युटुब व इन्स्टाग्रामवर असणार आहे.
यावेळी डिस्ट्रिक्ट ३२३४डी२ चे मुख्य कार्यकारीचे अधिकारी लायन श्याम खंडेलवाल, सचिव लायन अशोक मिस्त्री, खजिनदार लायन राजेंद्र गोयल, प्रथम महिला लायन भारती भंडारी, लायन द्वारका जालान, लायन फत्तेचंद रांका, लायन दीपक शाह, लायन चंद्रहास शेट्टी, लायन रमेश शहा, लायन राजकुमार राठोड, लायन सुनिल चेकर, लायन आनंद आंबेकर, लायन आशा ओसवाल, लायन शरद पवार, लायन दीपक लोया, लायन अभय चोक्सी, लायन संदीप मुथ्था, लायन प्रशांत शहा, लायन तुषार मेहता, लायन विजय जाजू, लायन आनंद खंडेलवाल, लायन धनराज भगनानी, लायन ज्योतीकुमार अग्रवाल, लायन संतोष नहार, लायन सुनील डागा, लायन उषा तिवारी, लायन कांतीलाल पार्लेशा, लायन महेंद्र गुंदेचा आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमामध्ये एकूण 91 क्लबचे अध्यक्ष, सचिव व खजिनदार सहभागी झाले होते. नवनियुक्त प्रांतपाल लायन विजय भंडारी यांचा परिचय मुख्य कार्यकारी अधिकारी लायन श्याम खंडेलवाल यांनी दिला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव लायन अशोक मिस्त्री यांनी केले तर, खजिनदार लायन राजेंद्र गोयल यांनी आभार मानले.