नाशिक | शिवसेना पक्षफुटीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गट वेगळे झाले. ठाकरे गटातील बहुतांश नेतेमंडळी शिंदे गटात सहभागी होत आहे. त्यानंतर आता नाशिकमध्ये ठाकरे गटातील तब्बल 17 माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. या प्रवेशाने ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी गेल्या 10 दिवसांत नाशिकमध्ये दोन वेळा दौरा केला. त्यात त्यांनी नाशिक मतदारसंघात आपलं वर्चस्व राहील, असा प्रयत्न केला होता. नाशिकमध्ये खासदार हेमंत गोडसे यांच्याशिवाय इतर कोणी शिंदे गटात गेले नव्हते. मात्र, संजय राऊत हे नाशिकमधून बाहेर पडताच तब्बल 17 माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान, ठाकरे गटातील अनेक नेतेमंडळींचा शिंदे गटात प्रवेश होत आहे. आत्तापर्यंत अनेक आमदार, खासदार यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर आता नाशिकच्या नगरसेवकांनी प्रवेश केला आहे.