मुंबई | विधिमंडळाच्या अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील (Jayant Pawar) यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने त्यांचं निलंबन करण्यात आलं. त्यावर पक्षश्रेष्ठी नाराज असल्याचे म्हटले जात आहे. त्यानुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अजित पवार यांना फोन केल्याचे समजते.
जयंत पाटील यांच्या निलंबनानंतर राज्यात ठिकठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकाऱ्यांनीही दबावातून कारवाई केल्याचा आरोप केला. राष्ट्रवादीच्या गोटातून जयंत पाटील यांच्या निलंबनानंतर संतापाचा सूर उमटला. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांना दूरध्वनीवरुन संपर्क केला असल्याचे सांगण्यात येत आहे.
यावेळी शरद पवार यांनी सभागृहात नेमकं काय घडलं, याची माहिती घेतली. जयंत पाटील यांना नेमकं काय म्हणायचं होतं? कोणत्या कारणावरुन त्यांचं निलंबन केलं गेलं? याची माहिती अजित पवारांकडून घेतली.