सातारा : भाजप आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्या कारला पहाटे भीषण अपघात झाला. आमदार गोरे यांची कार 30 फूट खोल खड्ड्यात कोसळली. यामध्ये गोरे यांच्यासह एका सहकारी जखमी झाला तर इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. यातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
फलटणच्या मलठण येथे पहाटे साडेतीनच्या सुमारास भीषण अपघात झाला. पुणे-पंढरपूर रस्त्यावर मलठण येथील स्मशानभूमीजवळ पुलावरून गाडी जात होती. त्याचवेळी चालकाचे फॉर्च्युनरवरील नियंत्रण सुटले आणि कार काही क्षणांतच 30 फूल खोल खड्ड्यात कोसळली.
या अपघातात जयकुमार गोरे आणि त्यांच्या सहकाऱ्याला किरकोळ दुखापत झाली. तर इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. यातील दोघांना पुढील उपचारासाठी बारामतीला नेण्यात आले आहे.