नागपूर | विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना सातत्याने धारेवर धरले जात आहे. त्यात आता विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सूचक विधान केले आहे. ”2 ते 3 मंत्र्यांची माहिती आपल्या हाती आहे. पण पुरावे हाती आल्याशिवाय सभागृहात बोलणं म्हणजे फुसका बार ठरेल”. तसेच कागदपत्रं, पुरावे गोळा करण्याचं काम सुरु आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरु आहे. या अधिवेशनात विविध मुद्यांवरून विरोधकांकडून सरकारवर टीका केली जात आहे. त्यात अजित पवार यांनी विधान केले आहे. ते म्हणाले, ”2 ते 3 मंत्र्यांची माहिती आपल्या हाती आहे. पण पुरावे हाती आल्याशिवाय सभागृहात बोलणं म्हणजे फुसका बार ठरेल”. तसेच कागदपत्रं, पुरावे गोळा करण्याचं काम सुरु आहे.”
दरम्यान, सीमाभाग केंद्रशासित केल्यास नवे प्रश्न निर्माण होतील. तसेच हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात असल्याने केंद्र सरकार या भागाला केंद्रशासित करुन घेईल का हाही मोठा प्रश्न आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.