मुंबई | राज्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे सरकार सत्तेवर आल्यापासून महाविकास आघाडीकडून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला जात आहे. त्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री शिंदेंना टोला लगावला. त्यानंतर आता मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘आता मी म्हणतो अडीच वर्ष बाहेर न पडणारा मुख्यमंत्री दाखवा आणि बक्षीस मिळवा’.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांनी हेलिकॉप्टरने शेतात जाणारा दुसरा मुख्यमंत्री दाखवा आणि एक लाख मिळवा, असा टोमणा मला मारला होता. पण आता मी म्हणतो अडीच वर्ष बाहेर न पडणारा मुख्यमंत्री दाखवा आणि बक्षीस मिळवा, अशा शब्दांत मुख्यमंत्री शिंदे यांनी टीका केली.
शेतकरीही हेलिकॉप्टरने फिरले पाहिजे
शेतकरीही हेलिकॉप्टरने फिरले पाहिजे. तालुक्या-तालुक्यामध्ये हेलिपॅड करायचे आहे. त्याचं कारण म्हणजे कुणाला कधी आरोग्याचा प्रश्न झाला. तर त्याला एअर ऍम्ब्युलन्सने आणता आलं पाहिजे, हा आमचा हेतू आहे, असेही त्यांनी सांगितले.