मुंबई : भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा तंदुरुस्त झाला असला, तरी श्रीलंकेविरुद्धच्या आगामी ट्वेंटी-ट्वेंटी व वनडे मालिकांसाठी त्याला भारतीय संघात स्थान देणे निवड समितीने टाळले आहे.
सप्टेंबर महिन्यात बुमराच्या पाठीला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला संयुक्त अरब अमिराती येथे झालेल्या आशिया चषक ट्वेन्टी-२० स्पर्धेला आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियात झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेला मुकावे लागले होते. त्याच्या अनुपस्थितीचा भारताला फटका बसला. या दोन्ही स्पर्धामध्ये भारताला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते.
पण भारताला याच्या मध्ये काही यश मिळाले नाही. या स्पर्धे मध्ये भारतीय बुमरा वीणा भारतीय संघाची गोलंदाजी कमकवत दिसत होती. ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताला इंग्लंड कडून १० गडी राखून पराभव स्वीकारावा लागला.
बुमरा गेल्या काही काळापासून बंगळूरु येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दुखापतीवर उपचार घेत असून गोलंदाजीचा सराव करतो आहे. मात्र, फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेचे महत्त्व लक्षात घेऊन निवड समितीने बुमराबाबत धोका पत्करणे टाळले आहे. बुमराला आता सरावादरम्यान एखाद्या सामन्याप्रमाणे गोलंदाजी करण्यास सांगण्यात येणार आहे. यादरम्यान, त्याचा जास्तीतजास्त षटके टाकण्याचा प्रयत्न असेल. त्याला गोलंदाजी करताना कोणताही त्रास न जाणवल्यास त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन होणार असल्याचे समजते.