मुंबई | शिवसेना पक्षफुटीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गट वेगळे झाले. त्यात खरी शिवसेना कोणाची यावरून शिंदे गट विरूद्ध ठाकरे गट सामना सुरु आहे. पण आता उद्धव ठाकरेंचं पदच बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद शिंदे गटाच्या वकिलांनी केला आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेनेचे सर्वाधिकार उद्धव ठाकरे यांनी स्वतःकडे घेतले आणि शिवसेना पक्षप्रमुख पद तयार केले. हे पदच बेकायदेशीर आहे, असा युक्तिवाद शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी केला आहे. शिवसेनेची घटना ही बाळासाहेब ठाकरे यांनी तयार केली होती.
बाळासाहेब ठाकरे हयात असताना शिवसेना कार्याध्यक्ष हे पद उद्धव ठाकरे यांना देण्यात आलं होतं. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर घटनाबाह्य पद्धतीने शिवसेना पक्षप्रमुख हे पद तयार केलं, असेही यामध्ये म्हटले आहे.