पश्चिम महाराष्ट्रात माढा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची झाली आहे. भारतीय जनता पार्टीने विद्यमान खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनाच पुन्हा उमेदवारी दिल्यानं अकलुजचे मोहिते पाटील नाराज झालेत. मागच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपात दाखल झालेल्या मोहिते पाटलांनी कोणतीही डिमांड न करता माढ्यातून भाजपाचा उमेदवार निवडून आणण्यात मोलाचा वाटा उचलला. परंतु, यंदाही मोहिते पाटील घराण्यातून सक्रिय राजकारणात उमेदवार नसेल तर, मोहिते पाटील यांच्या राजकारणाच्या भविष्याचाच प्रश्न निर्माण होणारी परिस्थिती आहे. त्यामुळं विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील यांनी यावेळी कोणत्याही परिस्थितीत लोकसभा लढवायची म्हणून गेली अनेक महिने जय्यत तयारी केली… परंतु, त्यांना तिकिट न मिळालं नाही. आता त्यामुळं माढा लोकसभा मतदार संघात तिढा निर्माण झाला आहे. हा तिढा नेमका काय आहे. हेच या व्हिडिओतून जाणून घेऊयात…
मोहिते पाटलांना भाजपने डावलल्यानंतर त्यांनी शरद पवार यांच्या पक्षाकडून उमेदवारी घ्यावी आणि निवडणूक लढवावी अशी मागणी आता त्यांच्या कार्यकर्त्यांमधून होत आहे. सध्यातरी मोहिते पाटलांनी भाजप सोडण्याबाबत अधिकृत भूमिका घेतली नाही. दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर यांनीही रणजित निंबाळकरांच्या उमेदवारीला विरोध केला होता. परंतु त्यांची नाराजी दूर करण्यात देवेंद्र फडणवीस यांना यश आलं आहे… आता पेच राहिला आहे तो मोहिते पाटील यांचा…आता माढ्यामध्ये मोहिते पाटील बंडखोरी करणार की माघार घेणार हे हि लवकरच स्पष्ट होईल…