लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत आता मनसे देखील सहभागी होणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरु आहेत. तसे संकेतही मिळू लागले आहेत… राज ठाकरे हे सध्या दिल्लीत आहेत. आणि त्यांची भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांच्या सोबत होणार आहे. त्याबरोबरच मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर दिल्लीत खासदार म्हणून गेले तर आम्हाला आनंद होईल असं वक्तव्यही संदीप देशपांडे यांनी केलं आहे… बाळा नांदगावकर हे दक्षिण मुंबईतून लोकसभा लढवणार अशा चर्चादेखील सुरु झाली आहे.. परंतु, यानिमित्तानं एक प्रश्न उपस्थित होतोय… तो म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस सोबत असताना भाजपाला महाराष्ट्रात राज ठाकरेंची गरज का भासतेय…? हेच या व्हिडिओतून जाणून घेऊयात…
भाजपाने त्यांच्या महाराष्ट्रातील २० जागांवरील उमेदवारांची यादी जाहीर केली असली तरी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जाहीर झालेले नाहीत. सहा जागांवरील तिढा सुटत नाही. शिंदे आणि पवार काही जागांवर अडून आहेत असंही बोललं जात आहे. आता राज ठाकरे यांना सोबत घेतलं तर त्यांना किती आणि कोणत्या जागा दिल्या जाणार हे पाहावं लागेल. परंतु राज ठाकरे भाजपसोबत महायुतीत गेल्यास राज ठाकरेंना जनता स्वीकारणार का? कारण, २०१४ मध्ये मोदींचं समर्थन करीत त्यांनी स्वतःचे उमेदवार उभा केले तर २०१९ मध्ये उमेदवार उभा न करता काँग्रेस-राष्ट्रवादी कांग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार केला. मोदींवर टीका केली. आणि आता २०२४ च्या निवडणुकीत ते पुन्हा मोदी यांचे कौतुक करताना दिसणार. राज ठाकरे यांच्या या प्रत्येक निवडणुकीवेळी भूमिका बदलण्याचा त्यांना फटका बसेल की यावेळी महायुतीसोबत जाण्याचा फायदा होईल हे निवडणुकीच्या निकालावेळीच स्पष्ट होईल…