छत्रपती संभाजीनगरमध्ये तिहेरी लढत होणार असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे चंद्रकांत खैरे पुन्हा मैदानात आहेत.महायुतीकडून शिंदेंच्या शिवसेनेने संदीपान भुमरे यांना उमेदवारी दिली आहे. तर MIM चे विद्यमान खासदार इम्तियाज जलील हे देखील पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे.त्यामुळे इथं मोठा चुरशीचा सामना पाहायला मिळणार आहे.या तिहेरी लढतीत कोण कुणाचं गणित बिघडवणार ? कोणता फॅक्टर इथं महत्वाचा ठरणार ? हेच आपण या व्हिडिओतून पाहुयात..
एमआयएम, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिंदेंची शिवसेना या तिन्ही पक्षांनी आपापले उमेदवार घोषित केल्यानं संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत होणार असल्याचं निश्चित झालं आहे.गेल्या लोकसभा निवडणुकीत इम्तियाज जलिल यांनी चंद्रकांत खैरेंचा पराभव केला होता.या लोकसभा मतदारसंघासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून अंबादास दानवे हेही इच्छुक होते. पण आता ही लढत खैरे विरुद्ध जलिल विरुद्ध भुमरे अशी पाहायला मिळणार आहे.२०१९ च्या आधी शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांनी सलग चारवेळा खासदार म्हणून निवडून येण्याची किमया साधली होती. चंद्रकांत खैरेंनी बॅरिस्टर अंतुलेंपासून काँग्रेसच्या अनेक मातब्बरांना धूळ चारत या चारही निवडणुकांमध्ये विजय मिळवला होता. ‘खान विरुद्ध बाण’ या मुद्द्याचा प्रभावी वापर करून खैरेंनी दिल्ली गाठण्यात यश मिळवलं होतं..
चंदक्रांत खैरे यांना एकनिष्ठतेचे फळ म्हणून सहानुभूती मिळू शकते. त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो. तर दुसरीकडे इम्तियाज जलील यांना मात्र यावेळी वंचित ची साथ नाहीये. वंचितने इथं मुस्लिम उमेदवारालच उभा केलं आहे तर शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवारी दिलेल्या संदीपान भुमरे यांना देखील मोठी कसरत करावी लागणार आहे.शिवसैनिक विरुद्ध शिवसैनिक असा सामना होणार आहे. त्यामुळे मतदार कुणाच्या पाठीशी उभे राहणार हे पाहणं औत्सुक्याचं असेल…