२०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे २३ खासदार जिंकून आले होते. त्यातील काही २०१४ मध्येही निवडून आले होते, पण हॅटट्रिकची संधी असणाऱ्या काही खासदारांची या निवडणुकीत तिकिटं कापली गेली.महाराष्ट्रातील सात विद्यमान खासदारांना भाजपने उमेदवारी नाकारली आहे.हे सात खासदार कोणते आहेत.त्यांना तिकीट नाकारण्याची कारणं काय आहेत.हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात..
लोकसभा उमेदवारांची भाजपची पहिली यादी जाहीर झाली, त्यावेळी त्यात अनेक विद्यमान खासदारांची नावे नव्हती. त्यातून हे स्पष्ट झालं की.. भाजपकडून अनेक ठिकाणी उमेदवार बदलले जाणार आणि झालंही तसंच.भाजपने २३ विद्यमान खासदारांपैकी ७ जणांचं तिकीट कापलं आणि नव्या चेहऱ्यांना संधी दिली.. मुंबईतल्या तिन्ही विद्यमान खासदारांना धक्का देत दुसऱ्या उमेदवाराला संधी देण्यात आली.भाजपने उत्तर मुंबई मतदारसंघातील खासदार गोपाळ शेट्टी यांचं तिकीट कापलं.२०१९ च्या निवडणुकीत गोपाळ शेट्टी हे साडेचार लाखांपेक्षा जास्त मतांनी विजयी झाले होते. पण यावेळी पक्षाने त्यांच्याऐवजी पीयूष गोयल यांना उमेदवारी दिली. त्यांच्याबद्दल पक्षातंर्गत नाराजी असल्यामुळे त्यांचं तिकीट कापल्याची चर्चा आहे.
ईशान्य मुंबई म्हणजे उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपने मनोज कोटक यांच्याऐवजी मिहीर कोटेचा यांना तिकीट दिलं.मिहीर कोटेचा यांच्याविरोधात पक्षातील काहींची नाराजी आणि मतदारसंघात जनसंपर्क नसणे ही त्यांचं तिकीट कापण्याची कारणे सांगितली जात आहेत.उत्तर मध्य मुंबईतून प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन यांना हॅटट्रिक करण्याची संधी होती.पण पक्षाने संधीच न दिल्याने ती हिरावली गेली आहे. पूनम महाजन यांच्याऐवजी भाजपने प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे. २०१४ आणि २०१९ मध्ये पूनम महाजन विजयी झाल्या होत्या. पण, यावेळी त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. मुंबईतल्या या तीन लोकसभा मतदारसंघात भाजपने विद्यमान खासदारांना डच्चू दिला.यासह उर्वरित महाराष्ट्रातील चार ठिकाणी भाजपने उमेदवार बदलले आहेत.