महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे. महायुती सरकारच्या या कार्यकाळातील हा शेवटचा अर्थसंकल्प आहे.या अर्थसंकल्पात ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ लागू करणार असल्याची घोषणा करण्यात आलीय. महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी 21-60 वयोगटातील महिलांना दर महिना दीड हजार रुपये दिले जातील, असं या योजनेबद्दल माहिती देताना अजित पवार यांनी दिली.तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना प्रथम वारकरी आणि आषाढीच्या वारीसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत.अजित पवार यांनी बोला पुडंलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय असा जयघोष करत अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली.आषाढी वारीतील दिंड्यांना प्रति दिंडी 20 हजार रुपये निधी देण्यात येणार आहे. यासह महत्वाचे मुद्दे पाहुयात…
१) मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू केली जाणार.महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी 21-60 वयोगटातील महिलांना दर महिना दीड हजार रुपये दिले जातील.जुलै 2024 पासून ही योजना सुरू करण्यात येणार असून, यासाठी 46 कोटी रुपये मंजूर करण्यात येणार आहेत
२) स्वयंपाकातील इंधनाचा आणि महिलांच्या आरोग्याचा जवळचा संबंध असतो. गॅस सिलेंडर घराला परवडेल यासाठी पात्र कुटुंबाला वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत दिले जातील.
३) मुलींमध्ये उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. यासाठी 8 लाख वार्षिक उत्पन्नाची मर्यादा तसंच आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थिनींना पदवी शिक्षणासाठी 100 टक्के शुल्क माफ केले जाणार.
४)व्यावसायिक शिक्षणामध्ये आठ लाख रुपयांचे उत्पन्न असलेल्या मुलींना शंभर टक्के सवलत दिली जाणार
5) मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करणार, या योजनेनुसार महिलांना वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत मिळतील, या योजनेचा फायदा 52 लाख कुटुंबीयांना होणार आहे.
6) राज्यातील विविध शैक्षणिक संस्थांमधून 11 लाख विद्यार्थी पदवी, पदव्युत्तर होतात. 10 लाख विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामासाठी प्रशिक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना सुरू करणार. कापूस आणि सोयाबीन शेतकऱ्यांना पाच हजार रुपये प्रति हेक्टरी मदत देणार.
7) सारथी, बार्टी, महाज्योती, अमृत या संस्थांच्यामार्फत 2 लाख हून जास्त विद्यार्थ्यांना रोजगाराभिमूख प्रशिक्षण देण्यात आलं आहे. विद्यापीठ आणि शासनाकडून 100 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला जाईल.अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणार.
8) नवी मुंबईतील महापे इथे 25 एकर जागेत इंडिया जेम्स अँड ज्वेलरी पार्क नियोजित आहे, त्यातून एक लाख रोजगार निर्माण होतीलराज्यात 10 जिल्ह्यात 10 ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यात येणार. जालना, हिंगोली, धाराशीव, भंडारा, गडचिरोली, सातारा, अंबरनाथ या जिल्ह्यांचा समावेश.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्कुबा डायव्हिंग केंद्र सुरू करण्यात येईल. स्थानिकांना यातून रोजगार मिळेल.
9) राज्यातील विविध शैक्षणिक संस्थांमधून 11 लाख विद्यार्थी पदवी, पदव्युत्तर होतात.10 लाख विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामासाठी प्रशिक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना सुरू करणार.
10) शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी दरवर्षी 50 हजार युवकांना प्रशिक्षण दिलं जाईल.