पुणे | भाजप आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या काही वर्षांपासून त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या. मुक्ता टिळक यांनी पुण्याचे महापौरपदही भूषवले होते. त्या चारवेळा पुणे महापालिकेत सदस्यही राहिल्या.
मुक्ता टिळक या पुणे महापालिकेत नगरसेविका म्हणून कार्यरत होत्या. सदाशिव-नारायण पेठेतील प्रभाग क्रमांक 15 च्या त्या नगरसेविका म्हणून त्यांनी काम केले. त्या सलग चारवेळा नगरसेविका म्हणून विजयी झाल्या होत्या. त्यांचे पुण्यातील भावे स्कूलमधून शालेय शिक्षण झाले होते. तर त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून पुढील शिक्षण घेतले. मुक्ता टिळक यांनी पत्रकारितेचं शिक्षणही घेतले होते.
विविध पदे भूषवली
- पुणे भाजपच्या महापालिकेतील गटनेत्या
- स्थायी समितीच्या सदस्या
- 2017 साली त्या महापौरपदी विराजमान
- महापौर असतानाच 2019 साली विधानसभा निवडणुकीत विजयी.