मुंबई | विधानसभेच्या आज पाचव्या दिवशी भटक्या कुत्र्यांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावर काही आमदारांनी भटक्या कुत्र्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी आमदार बच्चू कडू यांनी सरकारला सल्ला देत भटक्या कुत्र्यांना आसामला पाठवा अस म्हटलं आहे.
भटक्या कुत्र्यावर सोप्पा इलाज सांगत पाळीव कुत्रे रस्त्यांवर येत असतील, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. याच्यावर समिती नेमण्यापेक्षा कृती योजना जाहीर करायला हवी. एखाद्या शहरात तसा प्रयोग करण्यात यावा.
तसेच, रस्त्यांवर असलेल्या भटक्या कुत्र्यांना उचलून आसाममध्ये नेऊन टाका. आसाममध्ये कुत्र्यांना किंमत आहे. आठ ते नऊ हजार रुपयांना कुत्रे विकले जातात. आम्ही गुवाहाटीला गेल्यावर तिथे कळलं, जसं आपल्याकडं बोकडाचं मांस खाल्लं जातं. तसं तिकडे कुत्र्यांचं मांस खाललं जातं, असं बच्चू कडूंनी सांगितलं.
त्यामुळे तेथील व्यापाऱ्याला बोलवून यावर उपाययोजना करण्याची गरज आहे. एक दिवसांत याच्यावर तोडगा निघेल. यासाठी तेथील सरकारशी बोलण्याची गरज आहे. याचा उद्योग होईल आणि ते घेऊन जातील. एकदाचा विषय संपवून टाका, असं बच्चू कडूंनी म्हटलं.