पुणे | भाजप नेते आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बाबरी मशीद पाडण्यात एकाही शिवसैनिकाचा सहभाग नव्हता, असा खळबळजनक दावा केला आहे. तर चंद्रकांत पाटील यांनी आपण त्यावेळी व्यवस्थापन संदर्भातील कामासाठी अयोध्येमध्ये उपस्थित होतो असंही सांगितलं होतं.
यावर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत चंद्रकांत पाटलांवर घणाघात केला. त्यांनी केलेल्या वक्तव्यावर उत्तर देत पुन्हा चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेवून त्यांच्या वक्तव्याचा गैरसमज झाला असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या टीकेला देखील चोख प्रतिउत्तर दिलं आहे.
इतके वर्ष चंद्रकांत पाटील कुठे होते, त्यांच्या बोलण्यावर विश्वास कसा ठेवायचा असं जयंत पाटील यांनी म्हटलं होत. यावर उत्तर देताना पाटील म्हणाले कोण जयंत पाटील ज्यांनी रामाचं नाव घेतल्यानंतर पाल पडल्यासारखं केलं ते आम्हाला रामाबद्दल काय शिकवणार असेदेखील ते म्हटले आहेत.
दरम्यान, जयंत पाटील हिंदूत्वावर काय बोलतात यापेक्षा उद्धव ठाकरे काय बोलतात याची मी काळजी केली पाहिजे. मी उद्धव ठाकरे यांना फोन करून विचारेन उद्धवजी मी बाळासाहेब यांच्याविषयी असं बोलेन का, पण जयंत पाटील काय बोलले यावर मी कशाला बोलेन म्हणत, जयंत पाटील यांना त्यांनी यावेळी डिवचलं.