मराठवाडा | गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये अवकाळी पावसाने थैमान घातला आहे. आज देखील मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागानं (IMD) वर्तवला आहे. या अवकाळी पावसाचा शेती पिकांना देखील मोठा फटका बसला आहे. त्यामुळं बळीराजाच्या चिंतेत वाढ झाली आहे.
त्याचबरोबर उद्या कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळीचा जोर वाढणार असून, काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. अवकाळी पावसामुळं शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. फळबागांसह रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं बळीराजा हतबल झाला आहे.
दरम्यान, 13 आणि 15 एप्रिल दरम्यान काही ठिकाणी गारपीट देखील होण्याची शक्यता आहे. अशातच आजही राज्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर दुसरीकडं विदर्भातील अनेक जिल्ह्यात तापमानाचा पारा 39 अंश सेल्सिअसच्या वर गेला आहे.