लोकसभा निवडणुकीचा निकाल लागून तीन दिवस उलटल्यानंतरही कुणाला किती मतं पडली या चर्चा ज्या त्या मतदारसंघात सुरूच आहेत.अशात यावेळच्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक मतांच्या फरकानं निवडणूक जिंकणारा उमेदवारही समोर आला आहे.तो उमेदवार कोण आहे ? कोणत्या मतदारसंघातील आहे ? किती मताधिक्याने निवडून आला आहे ? आणि त्या खालोखाल सर्वाधिक मताधिक्याने आणि मतांनी निवडून आलेले आणखी कोणते उमेदवार आहेत ? हे आपण या व्हिडिओतून पाहू.
सर्वाधिक मतांच्या फरकानं निवडणूक जिंकणाऱ्या उमेदवारांमध्ये आसामच्या धुबरी मतदारसंघातील काँग्रेसचे ५९ वर्षीय उमेदवार रकीबुल हुसेन यांनी बाजी मारली आहे. त्यांनी तब्बल १० लाख १२ हजार ४७६ मतांच्या फरकानं विजय मिळवला आहे. त्यांना एकूण १४ लाख ७१ हजार ८८५ मतं मिळाली. त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी, माजी खासदार मोहम्मद बदरुद्दीन अजमल यांना ४,५९,४०९ मतं मिळाली. खरंतर मध्य प्रदेशच्या इंदूर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार शंकर लालवानी यांनी बहुजन समाज पक्षाचे उमेदवार संजय सोळंकी यांचा ११,७५,०९२ मतांनी पराभव केला आहे. त्या अर्थानं त्यांचं मताधिक्य रकीबुल हुसेन यांच्यापेक्षा अधिक आहे. मात्र, शंकर लालवानी यांच्या मतदारसंघात नोटा या पर्यायाला २ लाख १८ हजार ६७४ मतं मिळाली आहे. त्यामुळं त्यांचं प्रत्यक्ष मताधिक्य १०,०८,०७७ इतकं झालं आहे. त्यामुळं सर्वाधिक मताधिक्याच्या यादीत ते दुसऱ्या क्रमांकावर गेले आहेत.सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेले रकीबुल हुसेन हे आसाममधील काँग्रेस नेते आहेत. ते २०२१ पासून आमदार आहेत. आसाम विधानसभेत ते समागुरी विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. २००२ ते २००६ या कालावधीत तरुण गोगोई सरकारच्या काळात त्यांनी तुरुंग आणि होमगार्ड, सीमा क्षेत्र विकास राज्यमंत्री म्हणूनही काम पाहिलं आहे. २००६ ते २०११ या काळात त्यांनी राज्याचे पर्यावरण व वन, माहिती व जनसंपर्क मंत्री म्हणूही काम पाहिलं आहे.
आता सर्वाधिक मताधिक्य मिळवणाऱ्या इतर उमेदवारांवर देखील एक नजर टाकुयात.
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि पाच वेळा खासदार राहिलेले शिवराज सिंह चौहान यांनी विदिशा मतदारसंघातून एकूण ११,१६,४६० मतं घेत विजय मिळवलाय. त्यांनी निकटचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रताप भानू शर्मा यांना ८,२१,४०८ इतक्या मतांनी पराभूत केलं.प्रताप भानू शर्मा यांना २,९५,०५२ मतं मिळाली.
भाजपचे नेते अमित शहा यांनी गुजरातच्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला आहे. त्यांना यावेळी ७,४४,७१६ मतांनी
प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या सोनल पटेल यांचा पराभव केला..अमित शहा यांना 10,10,972 मतं तर सोनल पटेल यांना २,६६,२५६ मतं मिळाली.
गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांनी नवसारी मतदारसंघातून १० लाख ३१ हजार ३५ मतं घेत विजय मिळवला. त्यांनी ७,१३,५२१ मतांनी प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार नैशाधभाई भूपतभाई देसाई यांचा पराभव केला…देसाई यांना २ लाख ५७ हजार ५१४ मतं मिळाली.
तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालच्या डायमंड हार्बर मतदारसंघातून ७,१०,९३० मतांच्या फरकाने विजय मिळवला.
त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते बिप्लब कुमार देब यांनी त्रिपुरा पश्चिम लोकसभा मतदारसंघातून ६,११,५७८ मतांच्या फरकाने विजय मिळवला.
गुजरातमधील वडोदरा मतदारसंघात भाजपचे हेमांग जोशी यांनी ५,८२,१२६ मतांच्या फरकाने विजय मिळवला आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी पढियार जशपालसिंह महेंद्रसिंह यांना २ लाख ९१ हजार ६३ मतं मिळाली.
माजी आयएएस अधिकारी आणि काँग्रेसचे उमेदवार शशिकांत सेंथिल यांनी तिरुवल्लूर मतदारसंघातून ५,७२,१५५ मतांच्या फरकाने विजय मिळवला. त्यांना एकूण ७,९६,९५६ मतं मिळाली.
तर सर्वात कमी मतांनी विजयी होणाऱ्या उमेदवारांमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या रवींद्र वायकर यांचं नाव येतं..रवींद्र वायकर यांनी महाराष्ट्रात सर्वात कमी फरकाने विजय मिळवला. त्यांचे प्रतिस्पर्धी ठाकरे सेनेच्या अमोल कीर्तिकर यांचा वायकरानी केवळ ४८ मतांनी पराभव केला आहे. वायकराना ४,५२,६४४ मतं मिळाली तर कीर्तिकरांना ४,५२,५९६ मतं मिळाली